Sukhad Vrudhatva [Marathi] by RATNAVALI DATAR [Paperback]
'सुखद मातृत्व', 'सुखद बालसंगोपन' या दोन पुस्तकांच्या यशानंतर याच मालिकेतले हे तिसरे पुस्तक 'सुखद वृद्धत्व'! वृद्धत्वाला सगळ्यांनाच सामोरे जावे लागते आणि आयुष्याच्या या क्लिष्ट टप्प्यात बरेचदा अवहेलना, दुर्लक्ष किंवा एकाकीपण वाट्याला येऊन मनात भय किंवा निराशा घर करू लागते. मात्र या टप्प्याला यशस्वीपणे व सकारात्मक दृष्टीने सामोरे कसे जावे यासाठी सल्ले व छोट्या-छोट्या टिप्स या पुस्तकामध्ये दिल्या आहेत. विशेष म्हणजे ह्या टिप्स व सल्ले लेखिकेने आपल्याला आलेल्या अनुभवांतून अत्यंत मार्मिक व योग्य पद्धतीने मांडल्या आहेत. तसेच यात आवश्यक वैद्यकीय चाचण्या, एखादा आजार झाल्यावर घ्यायची काळजी यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टीही सांगितल्या आहेत. त्यामुळे हे पुस्तक केवळ वृद्धांसाठी नसून त्यांच्या घरातल्यांसाठीही आहे.
Jetzt bei Ebay: